![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IND vs PAK Asia Cup 2022 LIVE: भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
IND vs PAK Asia Cup 2022 LIVE Score: यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने- सामने येणार आहेत.
LIVE
![IND vs PAK Asia Cup 2022 LIVE: भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स IND vs PAK Asia Cup 2022 LIVE: भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/28/fa05227d178d3e879fc8baa511ef8b831661687265162266_original.jpeg)
Background
IND vs PAK Asia Cup 2022 LIVE Score: यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) आमने- सामने येणार आहेत. आशिया चषकातील सर्वात मोठा सामना म्हणूनही या सामन्याकडं पाहिलं जातंय. भारत आणि पाकिस्तानचे संघ 10 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान अखेरचा सामना गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकात खेळला गेला. मात्र, या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे.
भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सामने खेळण्यात आले आहेत. यातील भारतानं 8 आणि पाकिस्तानने 5 सामन्यात विजय मिळवला आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. भारतानं सर्वाधिक 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आकडेवारीनुसार, भारताचं पारडं जडं दिसत असलं तरी, पाकिस्तानचा संघ सध्या टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात काटे की टक्कर
आयसीसीच्या टी-20 फलंदाजाच्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल आहे. तर, उपकर्णधार मोहम्मद रिझवान तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या संघानं फखर जमानसारखा अनुभवी खेळाडूही आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडं अधिक अनुभवी फलंदाज आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली यांच्याशिवाय भारताकडं ऋषभ पंत, सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या यांसारखे तडाखेबाज फलंदाज आहेत.
दोन्ही संघाची गोलंदाजी
दोन्ही संघांची गोलंदाजी मात्र तितकीशी मजबूत दिसत नाही. महत्वाचं म्हणजे, दोन्ही संघांचे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदी दुखापतींमुळं या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र, त्यांची भरपाई करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, यूएईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटूंना जास्त मदत मिळू शकते.
संघ-
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
पाकिस्तान:
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसैन.
हे देखील वाचा-
IND vs PAK: बाबर आझमसह पाकिस्तानचे 'हे' 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक!
भारत vs पाकिस्तान: 19.3 Overs / IND - 142/5 Runs
भारत vs पाकिस्तान: 19.2 Overs / IND - 142/5 Runs
भारत vs पाकिस्तान: 19.1 Overs / IND - 141/5 Runs
भारत vs पाकिस्तान: 18.6 Overs / IND - 141/4 Runs
भारत vs पाकिस्तान: 18.5 Overs / IND - 137/4 Runs
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)