मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मुलींना मोफत शिक्षणासंबंधीचा राज्य सरकारचा ना जीआर निघाला, ना अंमलबजावणी झाली. प्रवेशासाठी मुलींना भरमसाठ फी भरावी लागते. या भरमसाठ फीमुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसादिनी म्हणजेच 9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, असो की महाविद्यालयीन 662 व्यवसायीक कोर्सेससाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणेनंतर 4 महिने उलटूनही अद्याप अंमलबजाणवणी करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, 12 वी, पदवी, आणि पदव्युत्तर परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून मुला-मुलींचे महाविद्यालयीन प्रवेशही सुरू झाले आहेत. मात्र, प्रवेशावेळी फी आकरण्यात येत असल्याने विद्यार्थींनींकडून विचारणा केली जात आहे. त्यातच, विरोधी पक्षातील नेत्यांनीही मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं आहे. आता, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी तेट बदाम पाठवत चंद्रकांत दादांना आठवण करुन दिली आहे.
मुलींना मोफत शिक्षणासंबंधीचा राज्य सरकारचा ना जीआर निघाला, ना अंमलबजावणी झाली. प्रवेशासाठी मुलींना भरमसाठ फी भरावी लागते. महाविद्यालयाच्या भरमसाठ फी मुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते, किंवा शाळाच सोडावी लागते. परभणीमध्ये गेल्यावर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे, विरोधी पक्षांनी चंद्रकांत पाटलांसह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. यापूर्वी, खासदार सुप्रिया सुळेंनीही या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांना थेट सवाल केला होता. आता, रोहणी खडसे यांनी चक्क बदाम पाठवून त्यांना आठवण करुन दिली आहे.
महाराष्ट्रातील मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली होती. या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी आपण चंद्रकांत पाटील दादांना बदाम पाठवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी म्हटलं. विशेष म्हणजे रोहिणी खडसे यांच्या हातात बदामाची वाटीही दिसून येत आहे, त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदरच त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्रोल केल्याचं दिसून येत आहे.
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण.. असे म्हणत रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर हाती बदामाची वाटी घेऊन व्हिडिओ शेअर केला आहे. आपण दिलेल्या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी तुम्हाला हे बदाम पाठवण्यात येत आहे. आम्ही सगळे पदाधिकारी आपणास बदाम पाठवत आहोत. कारण, मुलींच्या महाविद्यालयी प्रवेशाला सुरुवात झाली असून सर्व मुली आपल्या मोफत शिक्षणाच्या घोषणेच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. त्यामुळे, लवकरात लवकर आपण मुलीच्या मोफत शिक्षणाचा शासन आदेश निर्गमित करावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
सर्व महिला पदाधिकारी ,कार्यकर्त्या
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 25, 2024
भगिनींना सस्नेह नमस्कार....
आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटिल यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी येत्या जुन महिन्यापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासुन ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख… pic.twitter.com/DnXZRbaeRT
चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, मी केलेल्या घोषणेनंतर काही दिवसांतच लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. त्यामुळे, राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आचारसंहिता लागू असल्याने मोफत मुलींच्या शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला नाही. तर, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आली. पण, विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, या निवडणुकीवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकत असल्याने विधानपरिषद निवडणुकांची आचारसंहिता पाळावी लागणार आहे. ह्या निवडणुका संपल्यानंतर कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, 27 जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
हेही वाचा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI