(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK: बाबर आझमसह पाकिस्तानचे 'हे' 5 खेळाडू टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक!
IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) आज भिडणार आहे.
IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) आज भिडणार आहे. दोन्ही संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना असेल. या सामन्यापूर्वी दोन्ही देशातील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेलीय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत कोणता संघ बाजी मारेल? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. इंग्लंड मध्ये गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या संघानं भारताला 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
कर्णधार बाबार आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ सातत्यानं चांगली कामगिरी करून दाखवत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ मागील टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात पोहचला होता. परंतु, या सामन्यात सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडं भारताविरुद्ध दमदार कामगिरी करण्याची क्षमता आहे. दरम्यान, बाबर आझमसह पाकिस्तानचे कोणते पाच खेळाडू भारतासाठी धोका ठरू शकतात? हे जाणून घेऊयात.
फखर जमान
पाकिस्तानचा फखर जमां भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. तो पाकिस्तानसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. बाबर आझम- मोहम्मद रिजवानच्या जोडीनंतर तो संघाचा डाव पुढं घेऊन जाईल. फखर जमां सध्या फॉर्ममध्ये नसला तरी भारताविरुद्ध त्यांनं दमदार कामगिरी करून दाखवलीय.
मोहम्मद रिझवान
टी-20 क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजांमध्ये मोहम्मद रिझवानची गणना केली जाते. 2021 च्या टी-20 विश्वचषकात त्यानं भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. मोहम्मद रिझवाननं पाकिस्तानसाठी 56 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 50 च्या सरासरीनं 1 हजार 662 धावा केल्या आहेत.
नसीम शाह
पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाह पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानच्या सुपर लीगमध्ये त्यानं दमदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दरवाजा ठोठावला. नुकतीच नेदरलँड्सविरुद्ध मालिकेत त्यानं उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. भारताविरुद्ध आज खेळण्यात येणाऱ्या टी-20 सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
शादाब खान
पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानचं पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. त्यानं 64 टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात त्यानं 73 विकेट्स घेतले आहेत. त्याला यूएईमधील खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आहे.
हारिस रौफ
शाहीन अफ्रिदीच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रउफच्या खांद्यावर संघाची मोठी जबाबदारी असेल. त्यानं पाकिस्तानकडून 42 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात 42 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
संघ-
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
पाकिस्तान
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-