IND vs PAK, Asia Cup 2022: विराट कोहली की बाबर आझम? कोण करणार सर्वाधिक धावा? चेतेश्वर पुजाराची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK, Asia Cup 2022: यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक 2022 मधील दुसऱ्या सामन्यात भारत- पाकिस्तान (India- Pakistan) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.
IND vs PAK, Asia Cup 2022: यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक 2022 मधील दुसऱ्या सामन्यात भारत- पाकिस्तान (India- Pakistan) यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. तर, पाकिस्तानी प्रेक्षक कर्णधार बाबर (Babar Azam) आझमकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करत आहेत. या महामुकाबल्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) विराट कोहली आणि बाबर आझम यांच्याबाबत मोठी भविष्यवाणी केलीय. भारत-पाकिस्तान सामन्यात या दोघांपैकी सर्वाधिक धावा कोण करणार? यावर त्यानं भाष्य केलंय.
चेतेश्वर पुजारा काय म्हणाला?
क्रिकइन्फोशी बोलताना चेतेश्वर पुजारा म्हणाला की, "माझ्या मतं विराटनं जास्त धावा करणं भारतीय संघासाठी चांगलं ठरेल. बाबर आझमलाही बाद करणं सोपं नाही. त्यासाठी भारतीय संघाला रणनीती आखावी लागेल. गेल्या दीड वर्षांपासून तो ज्या पद्धतीनं फलंदाजी करत आहे, त्यानुसार तो अव्वल खेळाडू आहे."
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार 74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.
पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचं प्रदर्शन
विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी केलीय. पाकिस्तानविरुद्ध सात डावात त्यानं 77.75 च्या सरासरीनं 311 धावा केल्या आहेत. यावेळी विराट कोहलीनं तीन अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्रईक रेट 118.25 इतका होता. एवढंच नव्हे तर, पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं तीन वेळ सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय.
अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर 8 विकेट्सनं विजय
आशिया चषकातील पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा संघ ऐकमेकांच्या आमने- सामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं 8 विकेट्स राखून श्रीलंकेच्या पराभव केलाय. भारत आज पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकातील त्यांचा पहिला सामना खेळेल. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी दुबईत खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-