(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli: कोहलीच्या नावावर होणार खास विक्रमाची नोंद; ठरणार पहिला भारतीय
आशिया चषकाला (Asia Cup 2022) कालपासून सुरुवात झालीय. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात या स्पर्धेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं श्रीलंकेवर 8 विकेट्सनं विजय मिळवला.
Virat Kohli's 100th T20I: आशिया चषकाला (Asia Cup 2022) कालपासून सुरुवात झालीय. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात या स्पर्धेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं श्रीलंकेवर 8 विकेट्सनं विजय मिळवला. या स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात खेळला जाणार आहे. या बहुप्रतिक्षेत सामन्याची दोन्ही देशातील प्रेक्षकांना उस्तुकता लागलीय. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जवळपास तीन वर्षापासून खराब फॉर्मशी झुंज देतोय. पाकिस्तानविरुद्ध आज खेळला जाणार टी-20 सामना विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील 100 टी-20 सामना असेल.
100 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारे खेळाडू
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 13 क्रिकेटपटूंनी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. रोहित शर्मा (132), शोएब मलिक (124), मार्टिन गुप्टिल (121), महमदुल्लाह (119), मोहम्मद हाफीज (119), इयोन मॉर्गन (115), पॉल स्टर्लिंग (114), केव्हिन ओ ब्रायन (110), जॉर्ज डॉकरेल (105), डेविड मिलर (104), रॉस टेलर (102), कायरन पोलार्ड (101) आणि रमुश्फिकुर रहीम (100) यांनी 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या यादीत विराट कोहलीचाही समावेश होणार आहे.
पाकिस्तानविरुद्ध विराटची आतापर्यंतची कामगिरी
विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात दमदार फलंदाजी केलीय. पाकिस्तानविरुद्ध सात डावात त्यानं 77.75 च्या सरासरीनं 311 धावा केल्या आहेत. यावेळी विराट कोहलीनं तीन अर्धशतक झळकावली आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्रईक रेट 118.25 इतका होता. एवढंच नव्हे तर, पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं तीन वेळ सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार 74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.
आशिया चषकातील भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
हे देखील वाचा-