एक्स्प्लोर

Asia cup 2018 : भारतानं पाकिस्तानला लोळवलं, फायनलचं तिकीट मिळवलं

पाकिस्तानकडून शोएब मलिक आणि कर्णधार सरफराझ अहमद यांनी चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 107 धावांच्या भागिदारी केली.

दुबई : टीम इंडियानं सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म केलं आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवननं झळकावलेली वैयक्तिक शतकं टीम इंडियाच्या दणदणीत विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.

रोहित आणि शिखरने सलामीला 210 धावांची भागीदारी रचली. शिखर धवननं शंभर चेंडूंत 16 चौकार आणि दोन षटकारांसह 114 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे पंधरावं शतक ठरलं. रोहित शर्मानं वन डे कारकीर्दीतलं एकोणिसावं शतक साजरं केलं. भारतीय कर्णधारानं 106 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह शतक झळकावलं.

पाकिस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी 238 धावांचं आव्हान दिलं होतं. अनुभवी शोएब मलिक आणि कर्णधार सरफराझ अहमद यांनी चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 107 धावांच्या भागिदारीनं पाकिस्तानला 50 षटकांत सात बाद 237 धावांची मजल मारून दिली.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानची तीन बाद 58 अशी घसरगुंडी उडवली होती. पण सरफराझ अहमदनं 44 धावांची आणि शोएब मलिकनं 78 धावांची खेळी करून पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. मग असिफ अली 30 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला टीम इंडियासमोर 238 धावांचं चांगलं आव्हान उभं करता आलं आहे.

भारताकडून जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट पटकावल्या. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात चार विकेट पटकावणाऱ्या रवींद्र जाडेजाला मात्र या सामन्यात एकही विकेट घेत आली नाही.

सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताचं आशिया चषकातील फायनलचं तिकीट जवळपास निश्चित होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs RR Live Score Updates : राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये! मुंबई 30 धावांनी पराभूत, वाचा प्ले-ऑफचे संपूर्ण वेळापत्रक
MI vs RR Live Score Updates IPL 2026 : राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये! मुंबई 30 धावांनी पराभूत, वाचा प्ले-ऑफचे संपूर्ण वेळापत्रक
MI vs RR IPL 2026 : राजस्थान-मुंबई सामन्यात मोठा ड्रामा! आधी विकेटचं सेलिब्रेशन, मग नो-बॉलचा धक्का; जडेजा-शार्दुलची जुगलबंदी पाहून चाहतेही झाले थक्क, VIDEO
राजस्थान-मुंबई सामन्यात मोठा ड्रामा! आधी विकेटचं सेलिब्रेशन, मग नो-बॉलचा धक्का; जडेजा-शार्दुलची जुगलबंदी पाहून चाहतेही झाले थक्क, VIDEO
KKR vs DC Live Score Updates : आर पारची लढाई! KKR चा टॉस जिंकून थेट गोलंदाजीचा निर्णय; दिल्लीला हरवून चालणार नाही, मुंबई इंडियन्सने 'हा' चमत्कार केला तरच उघडणार प्लेऑफचे रस्ते
आर पारची लढाई! KKR चा टॉस जिंकून थेट गोलंदाजीचा निर्णय; दिल्लीला हरवून चालणार नाही, मुंबई इंडियन्सने 'हा' चमत्कार केला तरच उघडणार प्लेऑफचे रस्ते
KKR Playoff Equation IPL 2026 : ...तर थेट गेम ओव्हर! कोलकाताला प्लेऑफसाठी इतक्या ओव्हर्समध्येच उरकावा लागणार मॅच; KKR समोर IPL इतिहासातील सर्वात कठीण समीकरण
...तर थेट गेम ओव्हर! कोलकाताला प्लेऑफसाठी इतक्या ओव्हर्समध्येच उरकावा लागणार मॅच; KKR समोर IPL इतिहासातील सर्वात कठीण समीकरण

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget