आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टॉप 5 मालिकावीरांची यादी पाहिल्यास पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नचा क्रमांक आहे. शेन वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमधून 8 वेळा मालिकावीराचा मान मिळवला.
2/9
भारतीय संघातील माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनेही 104 कसोटी सामने खेळले. त्याच्या या कारकीर्दीतील 319 धावांचा सर्वोत्कृष्ट विक्रम केला, 8586 धावांसोबत सेहवागनेही पाचवेळा मालिकावीर होण्याचा बहुमान मिळवला.
3/9
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजपर्यंत 200 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 15,921 धावा केल्या. यामध्ये त्याने 51 शतक झळकावले. तसेच त्याला 5 वेळा मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
4/9
यानंतर चौथ्या स्थानी न्यूझीलंडचा महान खेळाडू सर रिचर्ड हेडली यांचा क्रमांक आहे. त्यांनी 86 सामन्यांमधून 8 वेळा मालिकावीराचा मान मिळवला.
5/9
या यादीत अव्वल स्थानी असलेल्या, श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा आद्याप कोणीही विक्रम मोडू शकला नाही. त्याने 133 सामन्यातून 800 विकेटसचा विक्रम करत, 11 वेळा मालिकावीराचा बहुमान मिळवला.
6/9
दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचा दुसरा क्रमांक आहे. 166 सामन्यात 13,289 धावा आणि 292 विकेटस घेऊन 9 वेळा मालिकावीर बनण्याचा मान पटकावला.
7/9
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान आहे. इमरान खानने 88 सामन्यांतून आठवेळा मालिकावीराचा किताब पटकावला.
8/9
आर. अश्विनने अद्याप 36 सामने खेळले आहेत. यामध्ये 25.21 च्या सरासरीने त्याने 193 खेळाडू बाद केले. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अश्विनने पाचवेळा मालिकावीरचा बहुमान मिळवला. जर आजही त्याला मालिकावीर घोषित करण्यात आले, तर तो पाचवेळा मॅन ऑफ द सीरीजचा बहुमान मिळवणाऱ्या सचिन आणि सेहवागलाही मागे टाकेल.
9/9
भारतीय संघासाठी वेस्ट इंडिज दौरा अतिशय महत्त्वाचा राहिला आहे. कारण, या दौऱ्यामध्ये भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पुन्हा झेप घेतली आहे. तसेच कर्णधार विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात आर. आश्विनच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मालिकावीराच्या स्पर्धेत तो प्रमुख दावेदार झाला आहे. जर अश्विनने आपला परफॉर्मन्स कायम राखून मालिकावीराचा मान मिळवल्यास, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघातील माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग यांना तो मागे टाकेल.