एक्स्प्लोर
उरी घटना प्रचंड दु:ख देणारी: विराट कोहली

कानपूर: उरी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. याचदरम्यान, 500व्या कसोटीत शानदार विजय मिळवणारा कर्णधार विराट कोहली देखील या हल्ल्यानं प्रचंड दु:खी झाला आहे.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, 'एक भारतीय म्हणून अशा घटना फारच क्लेशकारक वाटतात, मनाला ठेच पोहचवणारी ही घटना आहे.' दरम्यान, भारतानं हा विजय मिळवून फक्त न्यूझीलंडलाच पराभूत केलेलंनाही तर कसोटी क्रिकेटमध्ये काही आठवड्यांपूर्वीच पहिल्या स्थानी विराजमान झालेल्या पाककडून हे स्थान हिरावून घेतलं आहे.
उरी घटनेविषयी बोलताना विराट म्हणाला की, 'सध्या जे काही सुरु ते फारच त्रासदायक आहे. आम्ही समजू शकतो की, शहिदांच्या कुटुंबीयांवर कोणता प्रसंग ओढावत असेल.'
उरी दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं केला होता.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
















