सुनील गावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना सुनील गावसकर यांनी अनुष्का शर्माचा देखील उल्लेख केला. गावसकरांच्या या टीकेवर अनुष्काने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
IPL 2020 : माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना त्यांनी अनुष्का शर्माचा देखील उल्लेख केला. गावसकरांच्या या टीकेवर अनुष्काने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अनुष्का म्हणाली, "सुनील गावसकर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की, तुम्ही केलेलं वक्तव्य हे अत्यंत त्रासदायक आहे. एखाद्या क्रिकेटरच्या खराब कामगिरीसाठी तुम्ही त्याच्या पत्नीला दोषी कसं ठरवू शकता? तुम्ही तर कायम खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला आहे. मग हा आदर मला असावा असं तुम्हाला नाही वाटत का?"
कालचा दिवस रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघासाठी अत्यंत वाईट होता. किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दारूण पराभव झाला. कर्णधार म्हणून विराटनेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यावेळी गावसकर यांनी टीका केली. या टीकेनंतर गावसकरांना पॅनेलवरून काढण्याची मागणी होत आहे.
दोन वेळा सोडला कोहलीने के. एल. राहुलचा कॅच
किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात केएल राहुलने 69 बॉल्समध्ये 132 रन्स काढले आणि त्याचसोबत काही नवे रेकॉर्ड्सही केले आहेत. तसेच आयपीएलमध्ये सर्वात कमी बॉल्समध्ये सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू बनला. कोहलीने राहुलचा दोन वेळा कॅच सोडला. पहिल्यांदा 17 व्या ओव्हरमध्ये डीप स्क्वेएर लेगवर जेव्हा राहुल 83 वर खेळत होता आणि त्यानंतर जेव्हा 18व्या ओव्हरमध्ये 89 वर खेळत होता तेव्हा, अशा दोन्ही वेळा कोहलीने केएल राहुलचा कॅच सोडला. त्यामुळे पंजाबचा संघ अवघे तीन विकेट्स गमावत 206 रन्सपर्यंत पोहचला.
संबंधित बातम्या :