एक्स्प्लोर
‘मी नेहमी तुझी काळजी घेईन...’, विराटचं अनुष्काला वचन
आजच्या जनरेशनमधील तरुण-तरुणी लग्नानंतर आपआपल्या जबाबदाऱ्या नीट समजू शकतील हा विचार लक्षात घेऊन ही जाहिरात तयार करण्यात आली आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघंही 'मान्यवर' ब्रॅण्डच्या एका जाहिरातीनिमित्त एकत्र आले होते. या दोघांचं नातं आणि लग्नाची थीम यांचा सुरेख मेळ या जाहिरातीत घालण्यात आला आहे. लग्नावेळी पती-पत्नी एकमेकांना अनेक वचन देतात. त्याच थीमवर आधारित विराट आणि अनुष्कानं मॉर्डन वचनं एकमेकांना दिली आहेत.
असं म्हणतात की, लग्न हे फक्त दोन जीवांचं नाही तर दोन आत्म्यांचं मिलन असतं. त्यामुळेच लग्न सोहळ्यात विधींना फार महत्त्व असतं. याच विधींमध्ये पती-पत्नी एकमेकांना बरीच वचनं देतात.
मान्यवर ब्रॅण्डनं याच धर्तीवर अनुष्का शर्मा आणि विराटची ही जाहिरात तयार केली आहे. ही जाहिरात अनुष्का आणि विराटनं शेअर केली आहे. ज्यामध्ये दोघांनी एकमेकांना अनेक वचनं दिली आहेत. पण तेही हटके स्टाईलमध्ये. आजच्या जनरेशनमधील तरुण-तरुणी लग्नानंतर आपआपल्या जबाबदाऱ्या नीट समजू शकतील हा विचार लक्षात घेऊन ही जाहिरात तयार करण्यात आली आहे.
अनुष्का आणि विराटनं नेमकी जाहिरात काय?
विराट आणि अनुष्का हे एका लग्नसोहळ्यात सहभागी झालेले असतात. नवरा-नवरी समोर बसलेले असतात. त्याचवेळी अनुष्का विराटला विचारते की, हे दोघं एकमेकांना काय वचन देत असतील? त्यावर विराट आपलं उत्तर सांगतो.
विराट : मी वचन देतो की, महिन्यातील 15 दिवस मी जेवण बनवेन.
अनुष्का : मी वचन देते की, 'तू जसंही जेवण बनवशील ते मी खाईन.'
अनुष्का : मी वचन देते की, तुझे सगळे सीक्रेट पासवर्ड मी माझ्या मनात जपून ठेवेन.
विराट : मी ते कधीच बदलणाच्या प्रयत्नही करणार नाही.
अनुष्का : मी कधी-कधी तुला कॅरममध्ये जिंकू देईल.
विराट : मी कोणत्याही शोचा सीजन फिनाले तुझ्याशिवाय पाहणार नाही.
अनुष्का : तू मला जानू, शोना, बेबी, क्यूटी अशा नावांनी हाका मारणार नाहीस.
विराट : मी नेहमी तुझ्यासाठी फीट राहीन.
विराट : मी नेहमी तुझी काळजी घेईन...
VIDEO :
संबंधित बातम्या :
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement