एक्स्प्लोर
BCCI च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर बिनविरोध
![BCCI च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर बिनविरोध Anurag Thakur Takes Over As Bcci President BCCI च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर बिनविरोध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/21211213/Anurag-Thakur-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाकूर यांनी बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा देऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बीसीसीआयच्या सचिवपदाची धुरा अजय शिर्के यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त होतं. त्यानंतर ठाकूर हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करणारे एकमेव उमेदवार होते.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार यंदा पूर्व विभागाकडे होता. म्हणजेच अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला पूर्व विभागातील किमान एका संघटनेकडून शिफारस गरजेची होती. पण पूर्व विभागातील बंगाल, ओरिसा, आसाम, झारखंड, त्रिपुरा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सहाही संघटनांनी ठाकूर यांनाच पाठिंबा दिल्यामुळे शशांक मनोहर यांच्यानंतर अनुराग ठाकूर बीसीसीआयची सूत्रं स्वीकारणार हे निश्चित झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)