एक्स्प्लोर
अनिल कुंबळे टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची निवड जवळपास निश्चित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आज संध्याकाळी टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण याची अधिकृत घोषणा करणार आहेत. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयच्या सल्लागार समितीने कोलकातामध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये रवी शास्त्री, टॉम मूडी, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे आणि अनिल कुंबळे यांचा समावेश होता. बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मणसह सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. सर्व उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असल्या तरी आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अखेर कोणाची वर्णी लागते, याबाबत उत्सुकता लागली आहे.
मुख्य प्रशिक्षपदसाठी कुंबळे मजबूत दावेदार
मात्र मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळेचं नाव आघाडीवर आहे. कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 619 विकेट्स, 271 वन डे सामन्यात 337 विकेट्स घेतल्या आहे. तसंच तो भारताचा यशस्वी गोलंदाजही आहे. अनिल कुंबळेचं वय 45 वर्ष आहे. त्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत कुंबळेचं वय कमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या दबावाशी तो परिचीत आहे. 2010 मध्ये आयपीएलमध्येही तो खेळला आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगोलरचा मेन्टॉर म्हणून अनिल कुंबळेने काम केलं आहे.अनिल कुंबळेंची कारकीर्द
कसोटी - 132 विकेट्स - 619 कसोटीत सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुरलीधरन आणि वॉर्ननंतर कुंबळे तिसऱ्या स्थानावर 1999 साली पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटीच्या एकाच डावात दहा विकेट्स काढण्याची कामगिरी वन डे सामने - 271 विकेट्स - 337 1996 ते 2003 या कालावधीत चार वन डे विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व 2007 ते 2009 या कालावधीत भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्त्व. 14 कसोटींत 3 विजय, 5 पराभव 2012-2013 या कालावधीत रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा आणि 2013-2015 या कालावधीत मुंबई इंडियन्सचा चीफ मेन्टॉर 2010 कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद 2012 आयसीसीच्या क्रिकेट समितीचं अध्यक्षपदसंबंधित बातम्या
सचिन, सौरव आणि लक्ष्मण निवडणार टीम इंडियाचा कोच!
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखत
भारतीय प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी संदीप पाटलांना बोलावणं नाही
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच?
टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीत विराटचा महत्त्वाचा रोल
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























