एक्स्प्लोर
एक वर्षापूर्वी सचिनशी तुलना, आता चाहत्यांकडून निवृत्तीचा सल्ला
अॅलिस्टर कूकची सचिनशी तुलना करणाऱ्यांमध्ये क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचा समावेश होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. अॅलिस्टर कूकला आता निवृत्तीचा सल्ला दिला जातोय.
मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढेल, असं बोललं जायचं. असं म्हणणाऱ्यांमध्ये क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचा समावेश होता. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. अॅलिस्टर कूकला आता निवृत्तीचा सल्ला दिला जातोय.
2017 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत जेव्हा कूकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 244 धावांची खेळी केली, तेव्हा त्याचं जगभरात कौतुक झालं. पण एका वर्षातच चित्र बदललं. यावर्षात कूकने नऊ कसोटी (भारताविरुद्ध साऊदम्पटन कसोटीपर्यंत) सामने खेळले आहेत, मात्र एकही शतकी खेळी करता आलेली नाही. यावर्षी त्याने 16 डावांमध्ये 18.62 च्या सरासरीने केवळ 298 धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकीय (70 धावा) खेळीचा समावेश आहे.
या खराब कामगिरीमुळे कूकची सरासरी गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच 45 च्या खाली आली आहे. भारताविरुद्ध 2006 मध्ये शतकी खेळीने करिअरची सुरुवात करणाऱ्या कूकची सरासरी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 235 धावांची नाबाद खेळी केल्यापासून 45 च्या खाली कधीही आली नाही.
एकापाठोपाठ एक सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम बनवणाऱ्या कूकने आतापर्यंत 160 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 12254 धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या कूकवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचंच बोलायचं झालं, तर कूकने आठ डावांमध्ये 13, 0, 21, 29, 17, 17 आणि 12 अशी खेळी केली आहे. त्याची सरासरी केवळ 18.05 एवढी आहे. कूकच्या फलंदाजीला नवं वळण देणारे इंग्लंडचे माजी कर्णधार ग्राहम गूचही कूकच्या कामगिरीने हैराण आहेत. त्याच्या खेळात कोणतीही सुधारणा होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.Is it time for Alastair Cook to say goodbye?
— Rasheed shakoor (@rasheedshakoor) August 30, 2018
Sorry to say, particularly as an Essex fan, it's time for the England selectors to put Alastair Cook out to pasture. #ENGvIND
— Paul Embery (@PaulEmbery) September 1, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement