एक्स्प्लोर
SAvsIND : भारताचे सलामीवीर स्वस्तात माघारी
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वॉण्डरर्स स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
भारताने या कसोटीसाठी रोहित शर्माऐवजी अजिंक्य रहाणेला, तर रवीचंद्रन अश्विनऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी दिली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही कसोटी जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे जोहान्सबर्गच्या कसोटीत टीम इंडियासमोर व्हाईटवॉश टाळून 'नंबर वन'ची प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान असणार आहे. दरम्यान, या कसोटीसाठी वॉण्डरर्सच्या खेळपट्टीवर गवत राखण्यात आलं असून, काल रात्री झालेल्या पावसाने फलंदाजांच्या दृष्टीने वातावरण आव्हानात्मक बनलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement