एक्स्प्लोर
4 वर्षानंतर श्रीशांतची क्रिकेटच्या मैदानावर एंट्री
तब्बल चार वर्षानं क्रिकेटर एस. श्रीशांतनं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं.

फाईल फोटो
कोच्ची (केरळ) : फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटर एस. श्रीशांतवर घालण्यात आलेली बंदी तब्बल 4 वर्षानंतर हटवण्यात आली. त्यानंतर काल (मंगळवार) श्रीशांतनं मैदानावर पुनरागमन केलं. श्रीशांत एका प्रदर्शनीय सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मैदान येताच स्टेडिअमधील प्रेक्षकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. केरळ हायकोर्टानं काही दिवसांपूर्वीच श्रीशांतवरील बंदी हटवण्याचं आदेश बीसीसीआयला दिले होते. दिल्ली पोलिसांनी 17 मे 2013 साली मुंबईतून श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. काही दिवस श्रीशांतची रवानगी तिहार जेलमध्येही करण्यात आली होती. काल (मंगळवारी) प्रोड्यूसर इलेव्हन वि. प्लेबॅक सिंगर इलेव्हन या दोन संघामध्ये सामना पार पडला. प्लेबॅक सिंगर इलेव्हन संघात श्रीशांतचा समावेश होता. या सामन्यात श्रीशांतनं फलंदाजीनं सुरुवात केली. या सामन्यानंतर बोलताना श्रीशांत म्हणाला की, 'मैदानावर परतल्यानं मला खूप आनंद झाला आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.'
आणखी वाचा























