एक्स्प्लोर
INDvsAUS : पंत 159*, जाडेजा 81 धावा, भारताचा पहिला डाव घोषित
रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शानदार खेळीमुळे भारताने 600 धावांचा टप्पा ओलांडला.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपला पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शानदार खेळीमुळे भारताने 600 धावांचा टप्पा ओलांडला. रवींद्र जाडेजा 81 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डावाची घोषणा केली. तर रिषभ पंत 159 धावांवर नाबाद राहिला.
त्याआधी चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकलं. त्याने 373 चेंडूंचा सामना करताना 193 धावांची बहारदार खेळी उभारली. त्यात 22 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर रिषभ पंतने पुजाराला चांगली साथ देत टीम इंडियाचा धावफलक हलता ठेवला. त्या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचली.
IND vs AUS 4th test : पुजाराचं द्विशतक थोडक्यात हुकलं
पुजारा बाद झाल्यानंतर रिषभ पंतने रवींद्र जाडेजाच्या साथीने टीम इंडियाला 600 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने 189 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 159 धावा केल्या. तर रवींद्र जाडेजाने 114 चेंडूंमध्ये 81 धावा केल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याआधी काल नाबाद असलेला हनुमा विहारी आज सकाळच्या पहिल्या सत्रात 42 धावांवर माघारी परतला.
ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लायनने चार, जॉश हेझलवूडने दोन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या
INDvsAUS : पुजाराचं शतक, सिडनी कसोटीत भारताची दमदार सुरुवात
INDvsAUS : अखेरच्या कसोटीत टॉस जिंकून भारताची प्रथम फलंदाजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement