सुमारे तासाभराच्या विवाहसोहळ्यानंतर हे नवदाम्पत्य परतीच्या प्रवासाला लागलं
2/6
संसारला तारेवरची कसरत म्हणतात... जयदीप आणि रेश्मानं अगदी पहिल्या दिवसापासूनच ही कसरत प्रत्यक्षात सुरु केली आहे... पण दोघांच्या नात्यातली गाठ त्या दोरीपेक्षा भक्कम आहे... हीच गाठ आयुष्यभर भक्कम राहो याच नवदाम्पत्याला शुभेच्छा
3/6
एरव्ही मैत्रिणींचं लग्न हॉल आणि मंदिरात लागलेलं पाहिलेली नवरी आपल्या या लग्नाच्या अनुभवानं थरारली होती. बरं हे सगळं पार पाडणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती... त्यासाठी तीन संस्था दोन दिवसांपासून झटत होत्या
4/6
यावेळी सुमारे शंभर पाहुणे मंडळींनी दरीच्या किनाऱ्यावर उभे राहून नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले. गिर्यारोहणाला चालना देण्यासाठी... आणि संसाराची सुरवात थरारक करण्यासाठीच या दोघांनी असं अभिनव लग्न केल्याची प्रतिक्रिया नवदाम्पत्याने दिली.
5/6
कोल्हापूरचा गिर्यारोहक जयदीप जाधव आणि पाडळीची रेश्मा पाटील या दोघांनी अभिनव पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला... आणि पावन खिंडीतला जखलाईचा कडा याठिकाणी दोन दिवसांपासून तयारी करण्यात आली... यावेळी फक्त जोडपंच नाही... तर भटजी बुवाही कमरेला पट्टा बांधून दाम्पत्यासोबत सुमारे हजार फूट खोल दरीच्या मधोमध लटकत होते.
6/6
आजवर आपण पाण्यातलं लग्न, हवेतलं लग्न पाहिलं असेल... पण आज कोल्हापुरात एक लग्न पार पडलं... जे तारांना लटकून करण्यात आलं... तेही बाजीप्रभूंमी लढवलेल्या पावन खिंडीत.