शरद पवार यांनी शहापुर तालुक्यातील अतिदुर्गम अशा वाऱ्याचापाडा येथील प्राथमिक शाळेत भेट देऊन शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधना.
2/6
कमल रामचंद्र खोडका या मजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या झोपडीत शरद पवारांनी जेवण केल्यानंतर या कुटुंबाला चांगलं घर बांधून देणार असल्याचं जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे आणि बबन हरणे यांनी सांगितलं.
3/6
जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने शहापूर येथील कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शहापूर मधील वाऱ्याचा पाडा या आदिवासी पाड्यावर रामचंद्र खोडके या आदिवासींच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. सोबत जितेंद्र आव्हाड हे देखील होते.
4/6
शरद पवार आले म्हणून परिसरातील नागरिकांनी गुढ्या उभारल्या होत्या.
5/6
6/6
शहापूर तालुक्यातील दौऱ्याचापाडा येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कर्करोग ग्रस्तांसाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व उच्च दर्जाचे शिक्षण देणारे विद्या संकुल उभारण्यात येत आहे, त्याचा भूमीपूजन सोहळा पार पडला.