भोगवे, निवती, सागरेश्वर, तळाशीर, तोंडवळी, वेळागर, मोचेमाड इथल्या किनाऱ्यांवर तुम्हाला जाता येईल.
2/9
पण जर तुम्हाला निरव शांतता अनुभवायची असेल तर येथील किनारे तुमची वाट पाहत आहेत.
3/9
बनाना राईड, पॅरासिलिंग, स्पीड बोट या सगळ्याचा तुफान अनुभव घेतल्याखेरीज आपली सहल पूर्ण होऊच शकत नाही.
4/9
गेल्या काही वर्षात तारकर्ली आणि देवबाग हे समुद्रकिनारे इतके नावारुपाला आले की इथल्या किनाऱ्यांवर सतत पर्यटकांची गर्दी असते.
5/9
नदीतून थोडासा प्रवास झाला की आपण लहानशा बेटावर उतरतो आणि इथले वॉटर स्पोर्ट आपल्याला खुणावत असतात.
6/9
कर्ली नदीच्या स्थितप्रज्ञ प्रवाहातून आपण प्रवासाला सुरुवात केली की उधाणलेला समुद्र आपल्याला त्याच्या कवेत घेण्यासाठी आसुसलेला असतो. संथ पाण्याच्या प्रवाहातून हळूहळू समुद्राच्या लाटांवर स्वार होताना मनालाही गुदगुल्या होतात.
7/9
देवबागमध्ये शिरल्यावरच तिथल्या वातावरणाच्या आपण प्रेमात पडतो. सध्या हिवाळ्याच्या सुट्टयांमुळे देवबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
8/9
हिरवीगार झाडी… लालबुंद सूर्य…. डाव्या बाजूला नदी आणि उजव्या बाजूला समुद्र असं संगमावर वसलेलं लहानसं देवबाग.
9/9
दिवाळी संपली असली तरी शाळा आणि कॉलेजची सुट्टी अजूनही संपली नाही आणि या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी अनेकांनी कोकण गाठलं आहे. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीनं मालवणचे किनारे अक्षरश: फुलून गेले आहेत.