मुख्यपृष्ठPhotosमुंबईतील चेंगराचेंगरीची अंगावर काटा आणणारी दृश्य
मुंबईतील चेंगराचेंगरीची अंगावर काटा आणणारी दृश्य
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 29 Sep 2017 12:31 PM (IST)
1/5
त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि जखमी होऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 18 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.
2/5
मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत.
3/5
आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.
4/5
तर 20 ते 25 जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
5/5
अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा ब्रिज तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे