दोडामार्गातील मांगेली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. कर्नाटक आणि गोव्याच्या जवळ असल्यामूळे ह्या धबधब्याला येथील पर्यटक सर्वाधीक पसंती देत आहेत.
3/5
तीन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकाच्या सीमेवर असलेला दोडामार्गातील मांगेलीच्या धबधब्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहवून टाकते. उंच डोंगर कपारीतून कोसळणारा दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावचा मनमोहक धबधबा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.
4/5
150 फुटांवरून कोसळणारा धबधब्याच्या मुळात जाण्यासाठी डोंगरात ट्रेकिंगचा आनंदही लुटता येतो. धबधब्याच्या मुळाशी न जाताही 150 फुटांवरुन कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार धबधब्याच्या परिसरात 500 मीटरच्या परिसरात हे पाण्याच्या तुषारानी आपोआप भिजण्याचा आनंद घेता येतो.
5/5
तळकोकणातील सर्वच धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असतात. पण तळकोकणातील दोडामार्ग येथील उंच कड्यावरुन गर्द वनराईत दाट धुक्यात 150 फुटांवरुन कोसळाणारा 'मांगेली धबधबा' सध्या पर्यटनाचं केंद्र बनल आहे.