शिपिंग तारीख वाढवण्यामागचं कारणही तसंच आहे. या फोनला जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे शिपिंग तारीख वाढवण्यात आली. या फोनची प्री बुकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिओ फोन दिल्ली-एनसीआरच्या स्टोअर्समध्ये 24 सप्टेंबरपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून या फोनची शिपिंग सुरु केली जाईल.
2/8
जिओ फोनची ज्यांनी बुकिंग केली आहे, त्यांना फोन घेताना एक हजार रुपये द्यावे लागणार आहेत. कारण फोन बुक करताना ग्राहकांनी 500 रुपये अगोदरच दिलेले आहेत. या फोनची किंमत शून्य रुपये आहे. मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये मोजावे लागणार आहेत. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
3/8
जिओ फोनची डिलिव्हरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार होती. मात्र ही तारीख कंपनीने आता पुढे ढकलली आहे. जिओ फोनची शिपिंग आता 25 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
4/8
जिओ फोन या शहरांमध्ये आल्यानंतर तो जिओ स्टोअर्समध्ये पोहोचवला जाईल. त्यानंतर लॉजिस्टिक्सच्या मदतीने ग्राहकांपर्यंत या फोनची डिलिव्हरी केली जाईल.
5/8
जिओ फोन 60 लाख ग्राहकांनी बुक केला आहे. 24 ऑगस्ट रोजी या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली. त्यानंतर वाढत्या मागणीमुळे कंपनीला या फोनची बुकिंग काही काळासाठी थांबवावी लागली. 26 ऑगस्टला या फोनची प्री-बुकिंग थांबवण्यात आली.
6/8
भारतात जिओ फोन सर्वात अगोदर मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये येणार आहे. म्हणजेच या शहरांमधील ग्राहकांना हा फोन सर्वात अगोदर मिळेल.
7/8
जिओ फोन तैवानमधून भारतात येणार आहे. कारण जिओने या फोनच्या निर्मितीसाठी तैवानच्या कंपनीशी भागीदारी केली आहे. हा फोन भारतात आल्यानंतर कोणकोणत्या शहरांमध्ये अगोदर येईल याची माहिती आता समोर आली आहे.
8/8
जिओ फोनची प्री-बुकिंग 24 ऑगस्ट रोजी सुरु करण्यात आली. एकाच दिवसात जवळपास 60 लाख ग्राहकांनी हा फोन बुक केला. त्यामुळे आता ग्राहकांना फोन मिळण्याची प्रतीक्षा आहे. नवरात्रीपर्यंत जिओ फोनची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे. एका दिवसाला 1 लाख फोनची डिलिव्हरी करण्याचं लक्ष्य जिओने ठेवलं आहे.