एक्स्प्लोर
IPL 2018 : गंभीर, रोहित आणि कोहली रैनाला मात देणार?

1/6

दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने आतापर्यंत 149 सामन्यातील 141 इनिंगमध्ये 4 हजार 418 धावा काढल्या आहेत. नव्या मोसमात विराट आणि सुरेश रैनामध्ये या विक्रमासाठी स्पर्धा असेल. विराटच्या या धावांमध्ये 4 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे.
2/6

यंदाच्या आयपीएलची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे धावांचं युद्ध पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. भारताचे चार दिग्गज फलंदाज एकमेकांचा विक्रम तोडण्यासाठी यावेळी प्रयत्न करतील.
3/6

दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधार चेन्नई सुपरकिंगच्या या तडाखेबाज फलंदाजाला आव्हान देऊ शकतील का, असा प्रश्न आहे.
4/6

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंगच्या सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 10 मोसमात खेळलेल्या 157 इनिंगमध्ये 4 हजार 540 धावा केल्या आहेत. 139 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा काढल्या. या विक्रमी धावांमध्ये एक शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.
5/6

कोहली आणि रैनानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने 159 सामन्यातील 154 इनिंगमध्ये 4 हजार 207 धावा काढल्या आहेत, ज्यामध्ये 1 शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
6/6

या यादीत चौथ्या क्रमांकावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 148 सामन्यांच्या 147 इनिंगमध्ये 4 हजार 132 धावा काढल्या आहेत. अजूनही तो आयपीएलमधील पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्याने आतापर्यंत विक्रमी 35 अर्धशतकं ठोकले आहेत.
Published at : 02 Apr 2018 09:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion