एक्स्प्लोर
सलमानला जेल झाल्यास 'हे' चित्रपट लटकणार!
1/5

सलमान खानचे चित्रपट मागील अनेक वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम करत आहेत. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी जोधपूर कोर्टात आज सलमान खानबाबत फैसला होणार आहे. जर सलमान यात दोषी आढळला तर त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बॉलिवूडच्या 'प्रेम'ला तुरुंगवास झाल्यास त्याच्या काही सिनेमांवर टांगती तलवार कायम आहे. या चित्रपटांवर कोट्यवधी रुपये लागले आहेत.
2/5

टायगर जिंदा है : सलमान खानचा हा सिनेमा 22 डिसेंबर 2017 ला प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरचा 'जग्गा जासूस' आणि सलमानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा क्लॅश होणार असल्याचं कळतं. टायगर जिंदा है सलमानच्या एक था टायगरचा सिक्वेल आहे. सिनेमाचं बहुतांश काम पूर्ण झालं असून पोस्टर रिलीज झालं आहे. मागील सिनेमाची कमाई आणि या सिनेमाचा खर्च पाहता 'टायगर जिंदा है' लटकला तर बॉलिवूडला मोठा झटका बसू शकतो.
Published at : 18 Jan 2017 11:24 AM (IST)
View More























