सेमीफायनलमध्ये खेळण्यापूर्वीच टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराजने सिंहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
2/8
वन डे क्रिकेटमध्ये 300 सामने खेळण्याचा विक्रम युवराजने पूर्ण केला आहे. 300 सामने खेळणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
3/8
आपला जीव वाचला, हीच मोठी गोष्ट आहे, असं युवराज सामन्यापूर्वी पीटीआयशी बातचीत करताना म्हणाला. कॅन्सरशी लढा देत युवराज पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला.
4/8
2011 च्या विश्वचषकात युवराजला कॅन्सरचा आजार असूनही तो टीम इंडियासाठी खेळतच राहिला. संपूर्ण विश्वचषकात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत त्याने टीम इंडियाला विश्वषकाचा किताब मिळवून दिला.
5/8
युवराजने 300 सामन्यांमध्ये 36.84 च्या सरासरीने 8 हजार 622 धावा केल्या आहेत.
6/8
फायनलमध्ये भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
7/8
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यानंतर 300 सामने खेळणारा युवराज पाचवा खेळाडू ठरला आहे.
8/8
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने मात करुन टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली.