एक्स्प्लोर
रायुडू, अय्यर, पृथ्वी शॉ, भारतीय संघात कोण कोण स्थान मिळवणार?
1/9

आज बीसीसीआय भारताच्या 6 संघांसाठी खेळाडूंची निवड करणार आहे. यामध्ये अफगाणिस्तानविरुद्धची 1 कसोटी, इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ, आयर्लंडविरुद्ध टी 20 संघ, इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 संघ, इंग्लंडविरुद्ध वन डे संघ, तर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नंतर भारतीय संघ निवडण्यात येणार आहे.
2/9

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्याचा घेतलेला निर्णय श्रेयस अय्यरच्या पथ्यावर पडण्याची चिन्हं आहेत. कारण अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतलेल्या विराट कोहलीच्या जागी, दिल्ली डेयरडेव्हिल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची निवड होण्याची शक्यता आहे.
Published at : 08 May 2018 08:53 AM (IST)
View More























