अर्जुन तेंडुलकरला घरातूनच क्रिकेटचा वारसा मिळाला आहे. अनेकांसोबत अर्जुनने सराव केला आहे. सीनियर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अर्जुनला क्रिकेटचे धडे दिले होते.
2/8
अष्टपैलू म्हणून संघात अर्जुनची भूमिका महत्त्वाची असेल. फलंदाजीसोबतच डावखुरा जलदगती गोलंदाज म्हणून अर्जुनने चांगली कामगिरी बजावली आहे. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघात खेळला आहे.
3/8
18 वर्षीय अर्जुन हा धरमशाला इथे नुकत्याच झालेल्या 25 खेळाडूंच्या सराव शिबिरात सहभागी झाला होता. या शिबीरातील कामगिरीच्या आधारावर अर्जुनची भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली. दिल्लीचा विकेटकीपर फलंदाज अनुज रावतकडे या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
4/8
या दौऱ्यातील पहिला चार दिवसीय कसोटी सामना 17 जुलै ते 20 जुलै दरम्यान तर दुसरा सामना 24 ते 27 जुलै दरम्यान खेळवला जाईल. तर वन डे मालिका 30 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येणार आहे. अर्जुनसोबत टीम इंडियाचे अन्य सहकारीही श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज आहेत.
5/8
या दौऱ्याच्या निमित्ताने अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत दिसला.
6/8
भारताचा अंडर 19 संघ श्रीलंका दौऱ्यावर 2 चार दिवसीय सामने आणि 5 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
7/8
नुकतीच अर्जुनची श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली आहे.
8/8
टीम इंडियाचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे.