सलीम खान : लेखक सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतलं. खान कुटुंबाने अर्पिताचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. सुमारे दोन वर्षांपूर्वी खान कुटुंबाने अर्पिताचं शाहीलग्न लावलं. आयुष शर्मासोबत अर्पिता विवाहबद्ध झाली असून त्यांना आहिल हा मुलगाही आहे.
2/7
सुभाष घई : दिग्दर्शक सुभाष घईंनी मेघना लहान मुलगी असतानाच तिला दत्तक घेतलं. युनायटेड किंग्डममधून तिने उच्चशिक्षण घेतलं. आता तिचं लग्न झालं आहे.
3/7
मिथुन चक्रवर्ती : अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी दिशानी, बाळ असतानाच तिला दत्तक घेतलं. दिशानी आता मोठी झाली असून मिथुन चक्रवर्ती यांनी तिचं अतिशय प्रेमाने संगोपन केलं आहे.
4/7
रवीना टंडन : अभिनेत्री रवीना टंडनने अनिल थडानीशी लग्ना होण्यापूर्वीच छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. छायाने नुकतीच गोव्यात शॉन मेंडससोबत लगीनगाठ बांधली.
5/7
रोहित शेट्टी : 'गोलमाल'चा दिग्दर्शक रोहित शेट्टीने तब्बल 10 मुलांना दत्तक घेतलं आहे. कॅन्सर पेशंट अँड असोसिएशनच्या कार्यक्रमादरम्यान त्याने मुलांना दत्तक घेतलं. या मुलांचं वैद्यकीय आणि हॉस्पिटलचा खर्च रोहित शेट्टीच करतो.
6/7
सुष्मिता सेन : सौंदर्यवती सुष्मिता सेनने रिनी आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. या दोन्ही मुलींची सिंगल मदर म्हणून देखभाल करत आहे.
7/7
प्रिती झिंटा : अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्या 34 व्या वाढदिवसाला तब्बल 34 अनाथ मुलींना दत्तक घेतलं. ऋषिकेष या अनाथलयातून तिने या मुलींना दत्तक घेतलं. त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च प्रिती करते. तसंच वर्षातून दोन वेळा त्यांना न चुकता भेटते.