एक्स्प्लोर
मुंबईकर मनोविकाराच्या छायेत?
1/7

महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये म्हणजेच केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीत येऊन गेलेल्या रुग्णांपैकी पाच लाख 59 हजार 954 रुग्णांची माहिती अभ्यासण्यात आली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 31.14 टक्के रुग्ण हे मनोविकारांवरील (Psychiatric Disorders) उपचारांसाठी आल्याचे दिसून आले.
2/7

रुग्णसंख्येच्या प्रमाणानुसार क्रमवारी ठरवल्यास त्यामध्ये मनोविकार आणि रक्तदाब-मधुमेहानंतर श्वान/प्राणी दंश, हृदयविकार, डेंग्यू, दमा, अनाकलनीय ताप, जुलाब आणि मलेरिया या आजारांचा समावेश आहे. याचप्रमाणे महापालिकेच्या 15 उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि 175 दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्येही जीवनशैलीशी निगडीत आजारांचे (Lifestyle Diseases) मोठे प्रमाण आढळून आले आहे.
Published at : 17 Apr 2018 08:50 AM (IST)
View More























