पाकिस्तानचं नागरिकत्व असलेले तीन नागरिक भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळून आले. त्यांच्या तपासाअंती ते चुकून आले असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं बीएसएफच्या जवानांनी तिघांनाही सुरक्षित पाकिस्तानमध्ये पोहचवलं.
2/5
पंजाबः पाकिस्तानच्या सीमेत भारताचा नागरिक चुकून घुसला तर त्याची काय परिस्थिती होईल, हे सर्वांनाच माहित आहे. पण भारताच्या सीमेत तीन पाकिस्तानी नागरिक चुकून घुसले. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन झालं.
3/5
तिघेही चुकून भारताच्या हद्दीत आले होते. त्यांची व्यवस्थित विचारपूस करण्यात आली. त्यांना भारतीय जवान आणि हा क्षण नेहमीसाठी लक्षात राहण्यासाठी चॉकलेट भेट देण्यात आले, असं बीएसएफ जवान सी. पी. मीना यांनी सांगितलं. (सर्व फोटो सौजन्यः एएनआय)
4/5
बीएसएफच्या जवानांनी आमची चांगल्या प्रकारे चौकशी केली. आम्हीही त्यांना सहकार्य केलं, असं तिघांपैकी एका पाकिस्तानी व्यक्तिने सांगितलं.
5/5
या घटनेनंतर भारतीय जवानांनी दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक होत आहे. (फोटो सौजन्यः bsf.nic.in)