यानंतर भारताची एकमात्र कसोटी बांग्लादेशसोबत होणार आहे. कसोटीचा दर्जा मिळविल्यानंतर बांग्लादेश पहिल्यांदाच भारतात कसोटी सामना खेळण्यासाठी येणार आहे. हा एकमेव सामना हैदराबादमध्ये होणार आहे.
2/6
इंग्लंडनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडियाची ही मालिका फ्रेबुवारी 2017 मध्ये असणार आहे. बंगळुरु, धरमशाला, रांची आणि पुणे मध्ये हे सामने आयोजित करण्यात आले आहेत.
3/6
यानंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत पाच कसोटी सामने खेळणार आहे. ज्याचं आयोजन मोहाली, राजकोट, मुंबई, विशाखापट्टणम आणि चेन्नईमध्ये होणार आहे. तर वनडे सामने पुणे, कटक आणि कोलकातामध्ये खेळविले जाणार आहे. तर टी-20 सामन्यांचं आयोजन बंगळुरु, नागपूर आणि कानपूरमध्ये करण्यात येणार आहे.
4/6
सगळ्यात आधी टीम इंडियाचा न्यूझीलंडशी मुकाबला होणार आहे. ज्यामध्ये तीन कसोटी सामने हे इंदौर, कानपूर आणि कोलकातामध्ये खेळविले जाणार आहेत. तर धरमशाला, दिल्ली, मोहाली, रांची आणि विशाखापट्टणममध्ये पाच वनडे सामने खेळविले जातील.
5/6
भारतात होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया सर्वात आधी न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्यांच्याविरुद्ध भारत पाच कसोटी, तीन वनडे खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. इंग्लंडनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत चार कसोटी सामने खेळणार आहे.
6/6
टीम इंडिया येत्या वर्षभरात बरीच व्यस्त असणार आहे. ज्यामध्ये बीसीसीआयनं 13 कसोटी, 8 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश केला आहे. टीम इंडियाचा सामना बांग्लादेश, न्यूजीलंड, इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया या दिग्गज संघांशी होणार आहे. 2016-17 साली भारतात कुठे-कुठे होणार क्रिकेटचे सामने यावर टाकूयात एक नजर: