एक्स्प्लोर
ट्विटरचं नवं फिचर; 2 तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार, युजर्स म्हणाले, "ट्विटर आता नेटफ्लिक्स झालंय"
Twitter : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून सातत्यानं नवनवीन बदल ते करत आहेत.

Twitter Blue
1/8

आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉन्च केले आहेत. याशिवाय कंपनीनं आपल्या अनेक सुविधांचे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे.
2/8

युजर्सना त्यांच्या अकाउंटला ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी शुल्क भरावं लागतं. यासोबतच ब्ल्यू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शन घेणाऱ्या ग्राहकांना ट्विटरकडून इतरही अनेक सुविधा दिल्या जातात. याच युजर्ससाठी आता मस्क नवकोरं फिचर घेऊन आले आहेत.
3/8

ट्विटर ब्लूच्या सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत.
4/8

एलॉन मस्क यांनी जाहीर केलं आहे की, आता ट्विटर ब्लूचे सदस्य दोन तासांच्या 8 GB पर्यंतच्या व्हिडीओ क्लिप अपलोड करू शकतील. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं.
5/8

एलॉन मस्क यांचं ट्वीट आल्यापासून अनेकांनी मस्क यांचं कौतुक करायला सुरुवात केली, तर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली. एका युजरनं म्हटलंय की, "ट्विटर हे नवं नेटफ्लिक्स आहे.", असं लिहिलं आहे.
6/8

एका युजरनं प्रश्न विचारलाय की, माझ्या लग्नाचा व्हिडीओ अपलोड करु शकतो का? एलॉन मस्क यांच्या ट्वीटवर अनेकांनी अशा गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.
7/8

काही काळापूर्वी ट्विटर हे मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जात होतं. एलॉन मस्क यांच्या आगमनानंतर प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच, येणाऱ्या काळातही अनेक बदल पाहायला मिळतील.
8/8

नुकतंच एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही घोषणा केली. त्यांनी लिंडा याकारिनो यांच्याकडे ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवली.
Published at : 19 May 2023 02:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
चंद्रपूर
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
