एक्स्प्लोर
Mohammed Shami : टीम इंडियाच्या ढाण्या वाघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात का घेतलं नाही? अजित आगरकर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Why Mohammed Shami Not Selected : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात तरुणांना संधी देण्यात आली आहे.
Why Mohammed Shami Not Selected For England Tour 2025
1/9

इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी (24 मे) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
2/9

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात तरुणांना संधी देण्यात आली आहे.
3/9

तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान यांना संघातून वगळण्यात आले आहे.
4/9

दुखापतीतून परतल्यानंतर, मोहम्मद शमीला त्याची लय शोधण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे.
5/9

याशिवाय, तो पुन्हा जखमी झाल्याच्या बातम्याही येत आहेत.
6/9

या कारणास्तव बीसीसीआय कोणताही धोका पत्करू शकत नाही.
7/9

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "मोहम्मद शमीला गेल्या आठवड्यात काही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा एमआरआय करण्यात आला. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
8/9

पुढे ते म्हणाले, आम्हाला इंग्लंड दौऱ्यावर कोणताही धोका पत्करायचा नाही आणि आमच्यासोबत एका तंदुरुस्त वेगवान गोलंदाजाला घेत आहोत".
9/9

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ (Team India Squad For England Tour 2025) - शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
Published at : 24 May 2025 03:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
बीड
व्यापार-उद्योग


















