एक्स्प्लोर
IPL 2023 PlayOff : चेन्नईसह आरसीबी आणि लखनौ संघासाठी प्लेऑफची आशा कायम, राजस्थान आणि मुंबई बाजी पलटणार?
IPL 2023 PlayOff : आयपीएल 2023 मधील 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
![IPL 2023 PlayOff : आयपीएल 2023 मधील 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/a18ca004dba560d9283a15c4adc500b01684500906949322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL 2023 Play Offs Chance | CSK | MI | RCB
1/12
![आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने बंगळुरु संघाला हरवलं असतं तर, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/eeb9c5098042dee7937781ce2d3c84b0ebfdc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने बंगळुरु संघाला हरवलं असतं तर, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता होती.
2/12
![बंगळुरु संघाच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. त्याने शानदार शतकी खेळी केली. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आरसीबी संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी कायम आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/def3c7560739d16934ac59e04aafc44362e38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरु संघाच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. त्याने शानदार शतकी खेळी केली. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आरसीबी संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी कायम आहे.
3/12
![पण आरसीबीच्या विजयानंतर प्लेऑफचं सर्व समीकरण बदललं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/94ec533400201d6ad2f553cab2d819eb659c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण आरसीबीच्या विजयानंतर प्लेऑफचं सर्व समीकरण बदललं आहे.
4/12
![बंगळुरु संघाने हैदराबाग विरुद्धा सामना जिंकून चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे, शिवाय इतर संघांसाठी प्लेऑफचा मार्गही कठीण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/deb01db8f2de8ddd76f28640e84d76fe35faf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरु संघाने हैदराबाग विरुद्धा सामना जिंकून चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे, शिवाय इतर संघांसाठी प्लेऑफचा मार्गही कठीण केला आहे.
5/12
![आयपीएल गुणतालिकेमधील टॉप 4 संघ प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoff) पोहोचतात आणि त्यातीलच एक संघ विजेता ठरतो. सध्या प्लेऑफमध्ये गुजरात संघाने स्थान मिळवलं आहे. 31 मार्च पासून सुरु झालेल्या आयपीएल लीगमधील 74 पैकी 65 सामने खेळवले गेले आहेत. पाच सामन्यांनंतर प्लेऑफमधील संघांचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यातून यंदाचा विजेता मिळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/51cfed3933996d2501a6a4e145dc31e69a45d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल गुणतालिकेमधील टॉप 4 संघ प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoff) पोहोचतात आणि त्यातीलच एक संघ विजेता ठरतो. सध्या प्लेऑफमध्ये गुजरात संघाने स्थान मिळवलं आहे. 31 मार्च पासून सुरु झालेल्या आयपीएल लीगमधील 74 पैकी 65 सामने खेळवले गेले आहेत. पाच सामन्यांनंतर प्लेऑफमधील संघांचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यातून यंदाचा विजेता मिळेल.
6/12
![आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईलाला शेवटच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/1b63e438e021e2eab35f1d0c1ebd9778d49e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईलाला शेवटच्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.
7/12
![जर चेन्नई संघ त्यांचा शेवटचा सामना हरला, तर त्यांना प्रार्थना करावी लागेल की मुंबई इंडियन्स, बंगळुरु आणि लखनौ यापैकी एका संघाचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव व्हावा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/0764b3f6cd219eb1c152dc9c6d50eac26eb62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर चेन्नई संघ त्यांचा शेवटचा सामना हरला, तर त्यांना प्रार्थना करावी लागेल की मुंबई इंडियन्स, बंगळुरु आणि लखनौ यापैकी एका संघाचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव व्हावा.
8/12
![चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्ली संघ सध्या प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेला असला, तरी सध्या संघ इतर संघांसाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/d84ab7fdf75fbc2978d521fc770c5430f1721.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्ली संघ सध्या प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेला असला, तरी सध्या संघ इतर संघांसाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
9/12
![लखनौ सुपर जायंट्स गेल्या काही सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनौ संघाकडे13 सामन्यांनंतर 15 गुण आहेत. लखनौला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/724f3b9b779f0be4e57c7f1b974a6c61db54b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखनौ सुपर जायंट्स गेल्या काही सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनौ संघाकडे13 सामन्यांनंतर 15 गुण आहेत. लखनौला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.
10/12
![लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरोधात रंगणार आहे. जर लखनौने त्यांचा शेवटचा सामना गमावला तर त्यांना नशीबाची साथ लागेल. त्यांना मुंबई इंडियन्स किंवा बंगळुरु संघ त्यांचा शेवटचा सामना हरण्याची अपेक्षा ठेवावी लागेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/31cf5a0df4c6492ce837953046c481c932ed7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरोधात रंगणार आहे. जर लखनौने त्यांचा शेवटचा सामना गमावला तर त्यांना नशीबाची साथ लागेल. त्यांना मुंबई इंडियन्स किंवा बंगळुरु संघ त्यांचा शेवटचा सामना हरण्याची अपेक्षा ठेवावी लागेल.
11/12
![रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/5118f028b520e3184e8bd7b9355db14c183c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढली आहे.
12/12
![आरसीबीने हा सामना गमावला असता तर मुंबई इंडियन्स संघाला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये सहज प्रवेश मिळवण्याची संधी होती. पण, आरसीबीच्या विजयामुळे प्लेऑफचं समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/19/b49eab05b27b15a94362777cc9d3ee801071c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबीने हा सामना गमावला असता तर मुंबई इंडियन्स संघाला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये सहज प्रवेश मिळवण्याची संधी होती. पण, आरसीबीच्या विजयामुळे प्लेऑफचं समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे.
Published at : 19 May 2023 06:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)