एक्स्प्लोर
RCB vs LSG : रिषभ पंतचं स्पेशल शतक, बंगळुरुचं टेन्शन वाढलं,लखनौचा धावांचा डोंगर, आरसीबीला विजयासाठी मोठं आव्हान
Rishabh Pant : रिषभ पंतनं आयपीएलमधील शेवटच्या साखळी सामन्यात दमदार शतक केलं. रिषभच्या या कामगिरीच्या जोरावर लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला.
रिषभचं दमदार शतक
1/6

लखनौ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 227 धावा केल्या.
2/6

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या दृष्टीनं आजचा सामना महत्त्वाचा आहे. आजचा सामना जिंकल्यास ते थेट क्वालिफायर 1 मध्ये जाऊ शकतात. मात्र, लखनौच्या फलदाजांनी बंगळुरुच्या गोलंदाजीची धुलाई केली.
3/6

रिषभ पंतनं 61 बॉलमध्ये 8 षटकार आणि 11 चौकारांसह 118 धावा त्यानं केल्या. रिषभ पंत नाबाद परतला.
4/6

रिषभ पंतनं शतकानंतर अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. रिषभच्या चाहत्यांनी त्याच्या या खेळीची पूर्ण सिझनमध्ये वाट पाहिली. अखेरच्या सामन्यात त्यानं शतक झळकावलं.
5/6

मिशेल मार्शनं देखील 5 षटकार आणि चार चौकार मारत 67 धावा केल्या. मिशेल मार्श रिषभ पंत यांच्या दमदार फलंदाजीमुळं लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला.
6/6

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 228 धावा कराव्या लागतील. आता लखनौचे गोलंदाज बंगळुरुला रोखण्यात यश मिळवतात का ते देखील पाहावं लागेल.
Published at : 27 May 2025 09:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























