एक्स्प्लोर
IPL 2024 KKR vs PBKS Shashank Singh: पंजाबने संधी दिल्यापासून धू धू धुतोय...; प्रतिस्पर्धी संघांना जोरदार नडतोय, कोण आहे शशांक सिंह?
IPL 2024 KKR vs PBKS Shashank Singh: कोलकाताने 20 षटकांत 6 उभारल्यानंतर पंजाबने 18.4 षटकांत 2 बाद 262 धावा केल्या. यासह पंजाबने टी-20 इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
shashank singh pbks
1/8

पंजाब किंग्सने (PBKS) चौकार-षटकारांचा वर्षाव झालेल्या सामन्यात विश्वविक्रमी विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 8 गड्यांनी बाद 261 धावा पराभव केला. (Image Credit- IPL)
2/8

कोलकाताने 20 षटकांत 6 उभारल्यानंतर पंजाबने 18.4 षटकांत 2 बाद 262 धावा केल्या. यासह पंजाबने टी-20 इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.(Image Credit- IPL)
3/8

पंजाब किंग्सने लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरले आणि 262 धावांचे ऐतिहासिक लक्ष्य 18.4 षटकात 2 गडी राखून पार करून विजयाची नोंद केली. पंजाबकडून सलामी देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूंत 8 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. (Image Credit- IPL)
4/8

याशिवाय शशांक सिंहने 28 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.(Image Credit- IPL)
5/8

9 सामन्यात 263 धावा-शशांकने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 65.7 च्या सरासरीने आणि 182.6 च्या स्टाइक रेटने 263 धावा केल्या. शशांकने दोन अर्धशतक झळकावले आहेत. शशांकने आतापर्यंत 19 षटकार आणि 18 षटकार टोलावले आहेत. महत्वाचं म्हणजे शशांकने छोट्या-छोट्या पण स्फोटक खेळी करुन सर्वांना प्रभावित केले आहे.(Image Credit- IPL)
6/8

शशांकची कारकिर्द- 32 वर्षीय शशांक राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे. 2022 मध्ये पदार्पण केल्यापासून तो 14 सामने खेळला आहे. यामध्ये फलंदाजाने 160 धावा केल्या. त्याने लिस्ट ए च्या 30 सामन्यांमध्ये 986 धावा केल्या. त्याचवेळी, 59 टी-20 सामन्यांमध्ये 815 धावा केल्या.(Image Credit- Social Media)
7/8

कोण आहे शशांक सिंह?- शशांक सिंह हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे. शशांक सिंह गोलंदाजी देखील करु शकतो. आयपीएलच्या मिनी ऑक्शनच्या वेळी शशांक सिंहला संधी देण्यात कुठल्याही फ्रँचायजीनं पुढाकार घेतला नव्हता. पंजाब किंग्सनं शशांक सिंहला संघात घेतलं होतं मात्र काही कारणांमुळं त्यांना आपण चुकीच्या खेळाडूला संघात घेतल्याचं वाटलं होतं. काही काळानंतर गैरसमज दूर झाले आणि पंजाबनं शशांक सिंहला संघात घेतल्याचं जाहीर केलं होतं. (Image Credit- IPL)
8/8

मला यापूर्वी संधी मिळाली नाही- 04 एप्रिल रोजी झालेल्या पंजाब आणि गुजरात विरुद्धच्या सामन्यात देखील शशांकने स्फोटक खेळी केली होती. यानंतर त्याने केलेल्या विधानाची खूप चर्चा झाली. मला यापूर्वी अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. शशांक सिंगने स्पष्टपणे सांगितले की, खेळाडू तेव्हाच कामगिरी करू शकतो जेव्हा त्याच्यावर विश्वास दाखवला जातो आणि त्याला संधी दिली जाते, असं शशांक म्हणाला होता. सनरायझर्स हैदराबादने त्याला 2022 मध्ये खेळण्यासाठी जास्त संधी दिली नव्हती.(Image Credit- IPL)
Published at : 27 Apr 2024 08:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























