एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 Ind vs SA Final: रोहित शर्मा-विराट कोहलीला BCCI कडून पुन्हा संधी नाही?; आज अखेरचा टी-20 सामना ठरण्याची शक्यता
T20 World Cup 2024 India vs South Africa Final: टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
rohit sharma virat kohli
1/9

T20 World Cup 2024 India vs South Africa Final: टी-20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल.
2/9

टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
3/9

टी-20 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे.
4/9

दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळे यंदाचा टी-20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.
5/9

काही महिन्यांआधी फायनल गमावताच दोघांच्या डोळ्यांत दुःखाचे अश्रू तरळले होते. आज डोळ्यांत अश्रू यायला हवेतः पण ते आनंदाचे!
6/9

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने फायनल जिंकून विश्वचषक दिमाखात उंचवावा, अशी प्रत्येक चाहत्याची मनोमन इच्छा आहे.
7/9

बीसीसीआय आणि निवडकर्ते फायनलनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना या प्रकारात संधी देणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
8/9

राखीव दिवशीही पाऊस पडला तर...-आयसीसीच्या नियमानुसार अंतिम सामना न झाल्यास किंवा टाय झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येते. राखीव दिवशीही कोणताही संघ विजेता होऊ शकला नाही आणि सुपर ओव्हर देखील शक्य नसेल तर अंतिम सामन्याचा निकाल 'अर्निणित' म्हणून घोषित केला जाईल.
9/9

सुपर ओव्हर न झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. मात्र टी-20 विश्वचषकाच्या 17 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही संयुक्त विजेता झालेला नाही.
Published at : 29 Jun 2024 08:42 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























