एक्स्प्लोर

In Pics : भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, एक डाव आणि 132 धावांच्या फरकाने सामना जिंकत मालिकेतही 1-0 ची आघाडी

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे.

IND vs AUS

1/10
नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली आहे.

2/10
भारतानं सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

3/10
सामन्यात सुरुवातीपासून भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ज्यात ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली.

4/10
ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे.

5/10
भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या.

6/10
याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या.

7/10
ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर सामना भारतानं मोठ्या फरकाने जिंकला आहे.

8/10
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण भारताची स्टार फिरकीपटू जोडी जाडेजा आणि अश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी करत मिळून एकूण 8 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांत सर्वबाद केलं. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. अश्विन-जाडेजाशिवाय शमी आणि सिराजनं एक-एक विकेट घेतली.  

9/10
177 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यावर भारताकडून फलंदाजीला आलेल्या कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे पहिला दिवस संपताना भारतानं 77 धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुल 20 धावा करुन बाद झाला होता तर रोहित नाबाद 56 धावांवर क्रिजवर होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विन, विराट, केएस भरत, सूर्यकुमार, पुजारा हे सर्वजण स्वस्तात माघारी परतले. रोहितनं 120 धावा करत दमदार शतक ठोकलं. त्यानंतर जाडेजा आणि अक्षर यांनी एक दमदार भागिदारी उभारली पण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच जाडेजा 70 धावा करुन बाद झाला. मग शमीने 37 धावांची खेळी केली. ज्यानंतर अखेर अक्षर 84 धावा करुन बाद झाल्यावर 400 धावांवर भारताचा डाव आटोपला.

10/10
223 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच भारतानं धक्के देण्यास सुरुवात केली. स्टार फिरकीपटू आर अश्विनने तब्बल 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या मदतीला जाडेजानंही कमाल गोलंदाजी केली. त्यानंही महत्त्वाचे दोन विकेट्स घेतले. याशिवाय शमीनं दोन आणि अक्षरनं एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर सर्वबाद करत सामना एक डाव आणि 132 धावांनी भारताला जिंकवून दिला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ अखेरपर्यंत क्रिजवर 25 धावांवर नाबाद राहिला पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने सामना ऑस्ट्रेलियाने गमावला.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Embed widget