एक्स्प्लोर
Turkey Syria Earthquake : तुर्की-सीरियात हाहा:कार! भूकंपातील मृतांचा आकडा 24 हजारांवर; भारतीय NDRF ची कौतुकास्पद कामगिरी
Turkey Syria Updates : तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर येथील परिस्थिती फार बिकट झाली आहे. भारतीय NDRF नं कौतुकास्पद कामगिरी करत अनेकांचा जीव वाचवला आहे.
Turkey Syria Updates
1/8

तुर्की आणि सीरियामधील विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे. अद्यापही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत.
2/8

भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक तास उलटून गेले आहेत. तुर्की प्रशासन आणि भारतीय NDRF टीमकडून अनेक भागांमध्ये अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
3/8

तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) 6 फेब्रुवारी रोजीला मोठा भूकंप (Earthquake) झाला आहे. त्यासह पाच मोठो भूकंप झाले. तसेच 50 हून अधिक लहान भूकंपाचे झटके बसले.
4/8

भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 24 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे.
5/8

तुर्की प्रशासनासाह भारतीय जवान मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतले आहेत. NDRF च्या कामगिरीचं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी कौतुक केलं आहे.
6/8

प्रशासन मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतलं आहे. भारताने संकटात सापडलेल्या तुर्की आणि सीरिया मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे (Operation Dost) भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे.
7/8

भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांसह श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे.
8/8

भूकंपामध्ये अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक भागात अन्नाचं संकटही निर्माण झालं आहे. अनेक लोकांचा ढिगाऱ्याखाली अडकून भूक आणि थंडीमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मदत आणि बचाव पथकांसमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान, मदत आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
Published at : 11 Feb 2023 02:41 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र


















