एक्स्प्लोर
मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा पुरावा: 'हैदराबाद' गॅझेटियर नेमकं काय आहे?
मराठा आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, पण काय आहे हे 'हैदराबाद गॅझेट'? जाणून घ्या...
Manoj jarange maratha arakshan
1/6

हैदराबाद गॅझेट हा 1918 मधील निझाम काळातला एक महत्त्वाचा अधिकृत दस्तऐवज आहे. संस्थानात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत होती.
2/6

निजाम सरकारचा संस्थानातल्या मराठ्यांना सरकारी नोकऱ्या, शिक्षणात आरक्षणाचा निर्णय, हा निर्णय अधिकृत गॅझेट द्वारे नोंदवण्यात आला, म्हणून त्याला हैदराबाद गॅजेट म्हटलं जातं
3/6

यामध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित नोंदी आहेत. 1901 च्या मराठवाड्यातील जनगणनेनुसार, या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा करण्यात आला आहे.
4/6

त्यावेळी मराठवाड्यात सुमारे 36% मराठा-कुणबी लोकसंख्या होती. मराठवाडा प्रांतात कुणबी जातीची लोकसंख्या 46,10,778 एवढी होती. मराठा आरक्षणाच्या मागणीत ऐतिहासिक पुरावा म्हणून गॅझेट दाखवला जातो
5/6

मराठा समाज आधीपासूनच मागास, अशी शासकीय कागदपत्रांमध्ये नोंदीचा पुरावा मानला जातो.
6/6

सरकारने काढलेल्या जीआरनुसार, हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.
Published at : 08 Sep 2025 05:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























