एक्स्प्लोर
PHOTO : शिवप्रताप दिन, किल्ले प्रतापगड विद्युत रोषणाईने उजळला
शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने संपूर्ण प्रतापगड विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. इतकंच काय तर लेझरच्या सहाय्याने गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा ही दाखवली जाणार आहे.

Pratapgad Shivpratap Din
1/12

छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथांमधील एक दिवस म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला आफजल खानाचा केलेला वध.
2/12

हा इतिहास ऐकला की अंगावर शहारे येतात आणि याच शौर्याचा दिवस म्हणून शिवप्रताप दिन म्हणून प्रतापगडावर साजरा केला जातो.
3/12

या दिवशी गडावर ढोल-ताशांचा गजर होतो. शिवरायांची प्रतिकृती असलेली पालखी देवीच्या मंदिरातून अश्वरुढ असलेल्या गडावरच्या शिवरायांच्या पुतळ्यापाशी जाते.
4/12

शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने आज प्रतापगडावर मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थित अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.
5/12

यामध्ये प्रतापगडावरील भवानी मातेची पूजाही करण्यात येणार आहे.
6/12

सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत.
7/12

अविस्मरणीय असा हा सोहळा व्हावा यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
8/12

या निमित्ताने संपूर्ण प्रतापगड विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
9/12

इतकंच काय तर लेझरच्या सहाय्याने गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा ही दाखवली जाणार आहे.
10/12

शिवमय अस वातावरण गडावर या दिवशी पाहायला मिळतं. यंदा मात्र हा उत्सव खास आहे. त्याचं निमित्तही तसंच आहे.
11/12

तिथीनुसार ज्यादिवशी अफजलखानाचा छत्रपती शिवरायांनी वध केला, त्याच दिवशी अफझलखानाच्या कबरीजवळ उदात्तीकरण करुन त्या ठिकाणी बांधलेलं अतिक्रमण काढण्याची मोहीम शासनाने 24 तासात फत्ते केली.
12/12

हा सगळा नजारा पाहता ना आपसूकच तोंडातून शब्द निघतील छत्रपती शिवाजी महाराज की जय...
Published at : 30 Nov 2022 08:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
