एक्स्प्लोर
बांगडा, कोळंबी स्वस्त; सुरमाई, पापलेट महाग; जाणून घ्या माशांचे दर
मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारांच्या जाळ्यात बांगडा आणि प्रॉन्स जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत.

Ratnagiri Fish
1/8

कोकणात जवळपास दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारी पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छिमारांच्या जाळ्यात बांगडा आणि प्रॉन्स जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
2/8

त्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. पण त्याचवेळी सुरमई, पापलेट, हलवा या माशांचे दर चढे आहेत. असं असलं तरी बाजारात मासे खरेदीसाठी सध्या चांगलीच गर्दी दिसून येत आहे.
3/8

सध्या समुद्र देखील काही प्रमाणात खवळलेला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटिंगची संख्या कमी आहे. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढू शकेल अशी शक्यता आहे.
4/8

सध्या जेट्टीवर बांगडा 80 ते 100 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर इतर माशांचे भाव मात्र चढेच आहेत. तर कोळंबी 250 ते 300 रुपये किलो दराने मिळत आहे.
5/8

टायगर प्रॉन्स - 500 ते 550 रुपये किलो, सुरमई - 800 ते 1000 रुपये किलो, पापलेट - 700 ते 800 रुपये किलो दराने मिळत आहे.
6/8

याशिवाय मोडोसा - 600 रुपये किलो, हलवा - 600 ते 800 रुपये किलो, बोंबील - 230 ते 300 रुपये किलो, सौंदल - 300 ते 330 रुपये किलो दराने विक्री होत आहे
7/8

पावसाळा सुरु झाल्यावर जून आणि जुलै महिन्यात बंद असलेली कोकणातील मासेमारी ऑगस्ट महिन्यापासून सुरु होते.
8/8

दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर माशांची आवक आणखी वाढू शकेल अशी शक्यता मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.
Published at : 11 Aug 2023 11:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
