एक्स्प्लोर

आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला, चिन्ह वाटपात मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह द्यावं लागलं.

पुणे : महापालिका निवडणुकांसाठी (Election) उमेदवारी अर्ज भरताना अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची झुंबड पाहायला मिळाली तर, कुठे निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत वादावादीही घडली. पिंपरी चिंचवड (Pimpari) महापालिकेतही अर्ज छाननीनंतर उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे (NCP) या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र, त्यांचा एबी फॉर्म गहाळ झाला, त्यामुळे छाननीमध्ये त्यांना अपक्ष उमेदवार ठरवण्यात आलं. मग त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या चौकशीतून अखेर त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली, अन् घड्याळ हे चिन्हही देण्यात आलं. मात्र, अद्यापही त्यांचा एबी फॉर्म सापडला नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला, चिन्ह वाटपात मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह द्यावं लागलं. याप्रकरणात एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली. अजित पवार राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला होता, यात स्वतःची चूक असतानाही पाटील यांनी छाननीवेळी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवलं. त्यामुळे, या विरोधात जयश्री भोंडवेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. यात तथ्य असल्याचं पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले.

चौकशीनंतर एबी फॉर्म गहाळ

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एबी फॉर्म गहाळप्रकरणी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीनं सुनावणी घेतली. त्यानुसार, संबंधित उमेदवाराने मुदतीत अर्ज सादर केला होता, मुदतीतच त्यांनी एबी फॉर्म निवडणूक कार्यालयात सादर केला होता. जयश्री भोंडवे यांनी वेळेतचं एबी फॉर्म सादर केला होता त्यांच्या ही निदर्शनास आले. त्यामुळे, हर्डीकरांनी जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळ अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवेंना चिन्ह वाटपाच्या यादीत घड्याळ चिन्ह दिल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, हा घोळ ज्यांच्यामुळं झाला ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची आता बदली करण्यात आली आहे.

एबी फॉर्म अद्यापही गहाळ

संबंधित उमेदवाराने एबी फॉर्म सादर केल्याचे व्हिडिओ पुराव्यात दिसून येत आहे. मात्र, अन्य कुठल्यातरी दस्ताला तो लागलेला असावा. तो एबी फॉर्म गहाळ झालेला असला तरी त्यांच्याकडे असलेली पोच ग्राह्य धरुन त्यांना एबी फॉर्मनुसारच पक्षाचं चिन्ह वाटप करण्यात आले, असे महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. दरम्यान, एबी फॉर्मबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यानुसार चौकशी करण्यात येत आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती, जास्त अर्ज आले होते. त्यातूनच एखादी चूक झाली असून अन्य कुठल्याही तक्रारी प्राप्त नाहीत, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget