एक्स्प्लोर
Mumbai-Pune Express : पुणे, मुंबई एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, आठ ते दहा किमीपर्यंत रांगा, काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी लागतोय तासभर
Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Mumbai-Pune Express
1/6

पुणे: कामगार दिन व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनस्थळांकडे निघाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
2/6

खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान तब्बल आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत असून, काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासनतास वेळ लागत आहे.
3/6

आज कामगार दिनाच्या सुट्टीमुळे शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद आहेत, तसेच शाळांना उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने नागरिकांनी पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन केले आहे.
4/6

त्यामुळे महामार्गावर अचानक वाहनांची गर्दी वाढली असून, रस्त्यात अडकलेल्या पर्यटकांना वेळेचे नियोजन कोलमडले असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
5/6

तब्बल आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
6/6

मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनस्थळांकडे निघाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Published at : 01 May 2025 12:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























