Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: 'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक-लेखक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: रेणुका शहाणे, अभियन बेर्डे आणि हृता दुर्गुळे अभिनीत सिनेमाचं दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यानं केलं आहे. मुळात क्षितिज पटवर्धननं दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.

Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. चोहीकडे 'धुरंधर'चीच चर्चा होताना दिसतेय. असातच हॉलिवूडचा बुहुचर्चित 'अवतार' रिलीज झाला आणि त्यानं थेट बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवलेल्या 'धुरंधर'ला झटका दिला. पण, यातच 12 डिसेंबरला रेणुका शहाणे (Renuka Shahane), अभियन बेर्डे (Abhinay Berde) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांचा 'उत्तर' (Uttar Marathi Movie) हा मराठमोळा सिनेमा (Marathi Movie) रिलीज करण्यात आला. यावरुन सोशल मीडियावर जोरजार चर्चा रंगलेली. 'धुरंधर'सोबत मराठी असलेला 'उत्तर' रिलीज करण्याबाबतही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं. पण, 'धुरंधर' समोर 'उत्तर' अगदी पुरून उरला आहे. 'धुरंधर'च्या वादळातही 'उत्तर'ला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
रेणुका शहाणे, अभियन बेर्डे आणि हृता दुर्गुळे अभिनीत सिनेमाचं दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यानं केलं आहे. मुळात क्षितिज पटवर्धननं दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमातल्या अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं तर प्रचंड कौतुक केलं जात आहे. कित्येक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर थांड मांडून बसलेल्या 'धुरंधर'समोर 'उत्तर' अगदी ताठ मानेनं उभा राहिलाय. मराठी सिनेमाला कमी शो मिळूनही 'उत्तर' दमदार कामगिरी करत आहे. एकीकडे 'उत्तर'च्या यशाची चर्चा सुरू असतानाच. आता सिनेमाबाबत दिग्दर्शक क्षितिज पटवर्धननं एक खास पोस्ट केली आहे. ज्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन काय म्हणालाय? (Kshitij Patwardhan On Uttar)
मराठी सिनेमा रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे यांच्या 'उत्तर' सिनेमाचा दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाला की, "यापुढे मराठी मार खाणार नाही! चार पाच वर्षातून एकदा येणारा बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर' आणि चार पाच वर्षातून एकदा येणार ग्लोबल फेनॉमेना 'अवतार' यांच्या सोबत माझा पहिला सिनेमा 'उत्तर' प्रदर्शित झाला. 'धुरंधर'ने रणवीरच्या कॉंट्रोव्हर्सी नंतर सगळा नॅरेटिव्ह अक्षय खन्नावर फिरवला आणि मुळातच पॉवरफुल असलेल्या या सिनेमाने अजून जोर पकडला. बावीस बावीस शोज होते. अशावेळी पहिला सिनेमा घेऊन आलेला दिग्दर्शक म्हणून मी सगळ्यात आधी ठरवलं की, व्हिक्टीम कार्ड खेळायचं नाही! शोज मिळत नाही अशी आजिबात तक्रार करायची नाही, मराठी विरुद्ध हिंदी असं काहीही नॅरेटिव्ह आणायचं नाही. उलट जिथे शोज मिळतील ते कसे चालतील याकडे लक्ष द्यायचं..."
View this post on Instagram
"12 ला सिनेमा रिलीज झाला ज्याला शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला, पण तेव्हाच वाटलं की, सिनेमा 19 ला रिलीज होतोय, असं ट्रीट करूया आणि आणखी लोकांपर्यंत पोचवुया. मग कोल्हापूर, पुणे, आज मुंबई, वेगवेगळी कॉलेजेस, स्पर्धा, समारंभ इथे उपस्थिती लावली, सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्याबद्दलची जागरूकता वाढवली. परीक्षणं अप्रतिम आली, वीकडेजलासुद्धा शहरी सेंटर्समध्ये चांगली ऑक्युपन्सी होती. एशियन फेस्टिव्हलला सिलेक्शन झालं. बुक माय शोवर अप्रतिम रेटिंग आलं. दोन तुफानी सिनेमांसोबतच्या संघर्षाला सकारात्मक पद्धतीने तोंड दिलं आणि पुढेही देऊ. यात मराठी माध्यमं खूप उत्तम सपोर्ट करतायत. आमच्याकल्पनांची दखल घेतायत. आज दुसरा विकेंड आहे आणि 6 ठिकाणी शोज वाढले आहेत. अवतारचे रिव्ह्यूज मिक्स्ड आहेत आणि धुरंधर लहान मुलांसोबत बघता येत नाही. अशावेळी 'मराठी फॅमिली फिल्म' म्हणून 'उत्तर'चं पोझिशनिंग केलं, ज्याला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय! अशी वेळ या आधी आणि या पुढे अनेक मराठी सिनेमावंर येणार आहे, तेव्हा स्वतःच्या कन्टेन्ट वर विश्वास ठेवून, व्हिक्टीम कार्ड न खेळता, हुशारीने, आणि एक एक दिवस लढूनच सिनेमा पोचवावा लागणार आहे. एवढचं वाटलं की, या सगळ्यात एक मेसेज जाणं गरजेचं होतं की, कितीही मोठा हिंदी आणि इंग्लिश सिनेमा येऊ दे, मराठी सिनेमा मार खाणार नाही! द फाईट इज ऑन!!", असं दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन म्हणालाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























