एक्स्प्लोर
Raj Thackeray Meets Harshvardhan Patil : राज ठाकरे हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला; पुण्यातील निवासस्थानी घेतली भेट
Raj Thackeray Meets Harshvardhan Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.
Raj Thackeray Meet Harshvardhan Patil
1/10

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.
2/10

भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरेंची सभा झाली.
3/10

आज राज यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची पुण्यातील घरी भेट घेतली.
4/10

यावेळी राज यांच औक्षण करून स्वागत करण्यात आले.
5/10

हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी गणेश मूर्ती राज ठाकरे यांना भेट दिली.
6/10

राज यांनी पुण्यातील सभेत मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
7/10

शरद पवार साहेबांसोबत असतानाही अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही, असेही राज यावेळी म्हणाले.
8/10

पुणे शहराला नियोजनाची गरज आहे आणि त्यासाठी नगरसेवकापासून, आमदार आणि थेट खासदारापर्यंत एकदिलाने, संयुक्त काम होणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.
9/10

मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगत असल्याचे ते म्हणाले.
10/10

नरेंद्र मोदी, भाजपा सरकार ह्यांच्याशी माझे काही मुद्द्यांबद्दल मतभेद आहेत ते राहणार. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं अभिनंदन देखील मी जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.
Published at : 11 May 2024 10:54 AM (IST)
आणखी पाहा























