एक्स्प्लोर
Pune Dagadusheth Temple : किरणोत्सवात श्रीमंत दगडूशेठ' गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक; पाहा विलोभनीय फोटो...
श्रीमंत दगडूशेठ गणपती मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे पडली आणि जय गणेश... चा एकच जयघोष झाला.
dagdusheth temple
1/7

श्रीमंत दगडूशेठ गणपती मूर्तीवर महाभिषेक करण्यासाठी आणि गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे पडली आणि जय गणेश... चा एकच जयघोष झाला.
2/7

किरणोत्सव सोहळ्याच्या तिस-या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी सूर्यकिरणांनी प्रवेश केला.
3/7

प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.
4/7

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला.
5/7

श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती.
6/7

त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणे स्नान घालत असल्याचा भास होत होता.
7/7

सकाळी 8 वाजून 18 मिनीटे ते 8 वाजून 23 मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला.
Published at : 12 Feb 2023 01:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र























