एक्स्प्लोर
पुणे बेंगलोर महामार्गावर ट्रक-कंटेनरचा अपघात, बिअरच्या बाटल्या गोळा करायला नागरिकांची गर्दी
Pune Bengaluru Accident: पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pune Bengaluru Accident
1/5

पुणे-बेंगळुरू महामार्गावर कराडजवळील नांदलापूर परिसरात सकाळी भीषण अपघात झाला.
2/5

उभ्या असलेल्या बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, ट्रकमधील शेकडो बिअरच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्याने स्थानिक नागरिकांनी बाटल्या उचलण्यासाठी मोठी गर्दी केली.
3/5

प्राथमिक माहितीनुसार, बिअरने भरलेला ट्रक पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना काही कारणास्तव महामार्गाच्या कडेला उभा होता. याच दरम्यान मागून येणाऱ्या कंटेनरने ट्रकला जोरदार धडक दिली.
4/5

अपघातानंतर काही मिनिटांतच आसपासच्या गावांतील लोक घटनास्थळी जमा झाले. रस्त्यावर पडलेल्या बिअरच्या बाटल्यांसाठी पळवापळवी सुरू झाली. काही जणांनी प्लास्टिकच्या पिशव्या, टोपल्या आणि वाहनांमध्ये बाटल्या भरून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
5/5

अपघाताची माहिती मिळताच कराड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि बाटल्या उचलणाऱ्या नागरिकांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले.
Published at : 12 Aug 2025 11:11 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























