एक्स्प्लोर
Pune news : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गौराईंची पूजा; पहा फोटो
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी माहेरवाशीण जेष्ठा गौरीच्या आगमनाच्या दुसर्या दिवशी गौरी-गणपती पूजन आणि महानैवेद्याचा विधी पार पडला.
harshawardhan patil
1/8

माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी माहेरवाशीण जेष्ठा गौरीच्या आगमनाच्या दुसर्या दिवशी गौरी-गणपती पूजन आणि महानैवेद्याचा विधी पार पडला.
2/8

हा कार्यक्रम उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
3/8

हर्षवर्धन पाटील यांचे घरी परंपरेनुसार गौरी गणपतीचा सण हा प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा केला जातो.
4/8

यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी स्वागत केले आणि आपुलकीने संवाद साधला.
5/8

यावेळी हर्षवर्धन पाटील आणि भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
6/8

ज्येष्ठा गौराईची अतिशय आकर्षक अशी सजावट इंदापूर तालुका जिजाऊ महिला फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
7/8

यानिमित्ताने निवासस्थानी आलेल्या महिला व नागरिकांनी गौरी-गणपतीचे दर्शन व महानैवेद्य घेतला. याप्रसंगी निहार ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे व मान्यवर उपस्थित होते.
8/8

गौरी-गणपती दर्शना निमित्ताने भाग्यश्री बंगलो गर्दीने फुलून गेला होता.
Published at : 23 Sep 2023 01:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























