एक्स्प्लोर

BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

Raj Thackeray and Uddhav Thackeray seat sharing: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही क्षणी मनसे-ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray seat sharing: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही तासांमध्ये भाजप-शिंदे गट आणि ठाकरे बंधूंच्या मनसे-ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Camp) युतीकडून जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दोन्ही पक्षांचे मुंबईतील बहुतांश जागावाटप निश्चित झाले असले तरी काही जागांवरचा दावा दोन्ही पक्ष सोडायला तयार नाहीत. यामध्ये मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात (Bhandup News) असणाऱ्या वॉर्ड क्रमांक 114 चा समावेश आहे. ठाकरे गट आणि मनसे (MNS) दोन्ही पक्षाचे नेते वॉर्ड क्रमांक 114  कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाहीत. त्यामुळे आता हा तिढा सोडवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भांडूपमधील मनसेच्या नेत्या अनिषा माजगावकर यांना शिवतीर्थवर बोलावून घेतले आहे. आता शिवतीर्थवर राज ठाकरे त्यांच्याशी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावर हे भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मधून  आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी येथून आग्रही आहेत. तर मनसेच्या माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांनीही या जागेवर शड्डू ठोकला होता. अनिषा माजगावकर 2012 मध्ये इथून नगरसेविका झाल्या होत्या, तर 2017 मध्ये रमेश कोरगावकर यांनी अनिषा माजगावकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 114 कोणाला सुटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता राज ठाकरे शिवतीर्थवर अनिषा माजगावकर यांची समजूत घालणार की त्यांना या जागेवरुन लढण्यासाठी एबी फॉर्म देणार, हे पाहावे लागेल. भांडूप परिसरात कोकणातील लोक मोठ्याप्रमाणावर वास्तव्याला आहेत. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासूनच भांडूपमध्ये त्यांच्या पक्षाला मोठा जनाधार असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची वाताहात झाली असतानाही भांडूपमध्ये राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या रमेश कोरगावकर यांच्या पत्नीला दिल्यास याठिकाणचे मनसैनिक नाराज होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अनिषा माजगावकर यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मनसेकडून वॉर्ड क्रमांक 110, वॉर्ड क्रमांक 114 आणि 115 ची मागणी करण्यात आली आहे. यापैकी किती वॉर्ड मनसेला मिळणार, हेदेखील बघावे लागेल. 

दरम्यान, मंगळवारी सकाळी मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जागावाटपाबाबतच्या वाटाघाटींविषयी त्यांना माहिती देण्यात आली. यानंतर मनसेच्या पक्ष कार्यालयात स्वतंत्र बैठक सुरु आहे. या बैठकीला नितीन सरदेसाई, अनिषा माजगावकर, संदीप देशपांडे, योगेश सावंत, यशवंत किल्लेदार, कुणाल माईनकर उपस्थित राहणार आहेत. 

आणखी वाचा

राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, अमराठी विभागांमधील स्ट्रॅटेजीवर चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget